sandeep Shirguppe
भारतात कोट्यावधी लोकांची सकाळची सुरूवात कपभर चहाने होते. परंतु दिवसातून किती वेळा चहा प्यावा?
युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
तज्ञांनुसार, दिवसातून ३ ते ४ कप चहाचे सेवन केल्यास त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होतो.
चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे निद्रानाश, चक्कर येणे, छातीत जळजळ आणि अस्वस्थता होऊ शकते.
तज्ञांच्या अहवालानुसार, तुम्ही दिवसातून १ ते २ कप चहा पिल्ल्यास गंभीर आजारापासून लांब राहू शकतो.
तुम्हाला चहाची सवय असेल तर तुम्ही हर्बल टी किंवा ग्रीन टी घेऊ शकता.
पण साखर आणि चहाची पाने असलेला चहा टाळा. यामुळे तुम्हाला होणारा त्रास वाचेल.
जास्त चहा प्यायल्याने हाडे कमकुवत होऊ लागतात. तसेच लोहाची कमतरता कमी होते.