Deepak Bhandigare
'ताडोबा'तून सह्याद्रीच्या जंगलात आलेल्या तारा वाघिणीनं एक कमाल केलीय
एसटीआर ०५ म्हणजेच तारा वाघिणीनं १९ डिसेंबरच्या सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान पाण्यात उडी घेतली
वन अधिकाऱ्यांना वाटलं की ती जवळच पोहून जाईल, पण तिनं तसं न करता दोनशे मीटर पाण्यात गेल्यावर विचार बदलला
तारा थेट डावं वळण घेऊन झोळंबी पठाराच्या दिशेने गेली
साधारणतः तिनं चांदोली धरणाच्या वसंत सागर जलाशयातून दीड किमी अंतर पाण्यात पोहून पार केलं, जिथं मगरींचा वावर आहे
सध्या तारा झोळंबी पठारावर वास्तव्याला आहे, असे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण सांगतात
तिला रेडिओ कॉलर लावण्यात आलेला असल्याने तिच्या वाटचालीची माहिती नोंदवली जात आहे
ही वाघीण नवीन असल्यानं तिचा मुक्त संचार प्राणीप्रेमी आणि वन अधिकाऱ्यांसाठी आनंददायी असा आहे