Anuradha Vipat
गरोदरपणात केशर खाणे महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
केशर गर्भातील बाळाच्या वाढीसाठीच नाही, तर गरोदरपणात होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून आराम मिळवण्यासाठीही मदत करते.
गरोदरपणात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे चिडचिड किंवा नैराश्य येते. केशर शरीरात 'सेरोटोनिन'वाढवून मूड चांगला ठेवते.
केशरमधील पोटॅशियम आणि क्रोसेटिन गरोदरपणातील हाय ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतात.
गरोदरपणात गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. केशर पचनसंस्थेतील रक्ताभिसरण सुधारून पचनक्रिया मजबूत करते.
गर्भाचा आकार वाढल्याने पाय आणि पाठीत पेटके येतात. केशर अँटी-स्पॅस्मोडिक असल्यामुळे स्नायूंना आराम देते.
रात्री झोपण्यापूर्वी केशर दूध प्यायल्याने मन शांत होते आणि झोप चांगली लागते.