Anuradha Vipat
डिलिव्हरीनंतर वजन कमी करणे हा शरीराची ताकद आणि अंतर्गत आरोग्य परत मिळवण्याचा प्रवास आहे.
गरोदरपणानंतर घाईघाईने कडक डाएट किंवा जड व्यायाम केल्यास शरीराला इजा होऊ शकते.
बाळंतपणानंतर नियमित स्तनपान केल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज अतिशय वेगाने जळतात.
नॉर्मल डिलिव्हरी झाली असल्यास ६ ते ८ आठवड्यांनी आणि सिझरियन झाले असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच हालचाली वाढवाव्यात.
आहारात प्रथिने , फायबर, ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या आणि तृणधान्यांचा समावेश करा.
दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी आवर्जून प्या. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
नवजात बाळासोबत झोपेचे नियोजन करणे कठीण असते, परंतु अपुऱ्या झोपेमुळे शरीरात 'कॉर्टिसॉल' नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढतो, जो वजन कमी होऊ देत नाही.