Stop Nail Biting : नखे कुरतडण्याच्या सवयीने त्रस्त आहात? आजच ट्राय करा 'या' सोप्या ट्रिक्स

Anuradha Vipat

सामान्य पण वाईट सवय

नखे कुरतडणे किंवा नखे चावणे ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांमध्ये आढळणारी एक अतिशय सामान्य पण वाईट सवय आहे.

Stop Nail Biting | agrowon

नखे कुरतडणे

ताणतणाव, भीती, अस्वस्थता किंवा रिकाम्या वेळेत लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी लोक नकळत नखे कुरतडू लागतात.

Stop Nail Biting | agrowon

आजार

नखे कुरतडल्यामुळे नखांचे सौंदर्य तर बिघडतेच, पण नखांमधील जंतू पोटात गेल्याने अनेक आजारही होऊ शकतात.

Stop Nail Biting | agrowon

नियमित नखे कापा

नखे कुरतडण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नखे वाढूच न देणे. नखे नेहमी नेल कटरने ट्रिम करून बारीक ठेवा.

Stop Nail Biting | agrowon

कडवट नेलपॉलिश

बाजारात खास नखे चावण्याची सवय सोडवण्यासाठी 'कडवट चवीचे' नेलपॉलिश मिळतात. ते नखांवर लावल्याने जसे तुम्ही नख तोंडात न्याल, तशी कडवट चव लागेल आणि तुम्ही नख चावणे थांबवाल.

Stop Nail Biting | agrowon

मॅनिक्युअर करा

नखांना सुंदर आकार देऊन चांगल्या नेलपॉलिशने सजवा. नखे छान दिसू लागली की ती कुरतडून खराब करण्याची तुमची इच्छा होणार नाही.

Stop Nail Biting | agrowon

हातमोजे किंवा बँडेज

जर सवय खूपच जास्त असेल, तर घरी असताना बोटांना बँड-एड लावा किंवा हातमोजे वापरा.

Stop Nail Biting | agrowon

Dietary Fiber : रोजच्या आहारात फायबर का गरजेचे आहे? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे!

Dietary Fiber | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...