Anuradha Vipat
साबुदाणा फ्रूट कस्टर्ड हा उपवासासाठी एक अतिशय पौष्टिक, क्रीमी आणि चवदार पर्याय आहे.
नेहमीच्या साबुदाणा खिचडी किंवा वड्यापेक्षा काहीतरी वेगळे आणि थंडगार खावेसे वाटल्यास ही रेसिपी उत्तम ठरते.
साबुदाणा,दूध,साखर,वेलची पूड,१ वाटी बारीक चिरलेली (सफरचंद, केळी, डाळिंब, चिक्कू, द्राक्षे ,काजू, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे.
सर्वप्रथम एका पातेल्यात दोन वाटी पाणी उकळत ठेवा. पाणी उकळल्यावर त्यात भिजवलेला साबुदाणा टाका. साबुदाणा पूर्णपणे ट्रान्सपरंट होईपर्यंत मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे शिजवून घ्या.
पातेल्यात अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवा. दूध थोडे घट्ट होईपर्यंत १०-१२ मिनिटे आटवून घ्या.आटलेल्या दुधात साखर आणि वेलची पूड मिक्स करा.
दूध पूर्ण थंड झाल्यावर , गाळून ठेवलेला शिजवलेला साबुदाणा दुधात टाकून व्यवस्थित मिक्स करा. हे साबुदाणा आणि दुधाचे मिश्रण किमान १ ते २ तास फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्या.
सर्व्ह करण्याच्या अगदी आधी फ्रिजमधून मिश्रण काढा. त्यात बारीक चिरलेली ताजी फळे आणि ड्रायफ्रूट्सचे तुकडे मिसळा. तुमचे थंडगार आणि एनर्जीने भरपूर 'साबुदाणा फ्रूट कस्टर्ड' खाण्यासाठी तयार आहे!