Anuradha Vipat
श्रावण महिन्यात रुद्राभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. रुद्राभिषेकाने सुख, समृद्धी, शांती आणि रोग दूर होतात
श्रावण महिन्यात रुद्राभिषेक करण्यासाठी योग्य वेळ निवडा. घरी शिवलिंग स्थापित करा.
पूजेसाठी लागणारे साहित्य जसे की दूध, दही, मध, तूप, गंगाजल, बेलपत्र, फुले, भांग, धतुरा, नैवेद्य एकत्र करा
अगोदर गणेशाची पूजा करून रुद्राभिषेक सुरू करा. शिवलिंगाला पाण्याने स्वच्छ करा. त्यावर दुधाने अभिषेक करा.
अभिषेक करताना, रुद्र मंत्रांचा जप करा. अभिषेक झाल्यावर बेलपत्र, फुले, भांग, धतुरा शंकराला अर्पण करा.
श्रावण महिन्यात रुद्राभिषेक केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.
श्रावण महिन्यात रुद्राभिषेक केल्याने सुख, समृद्धी, शांती आणि आरोग्य लाभते व कुंडलीतील दोष दूर होतात