Aslam Abdul Shanedivan
अनेकांना आपल्या घराच्या परिसरात किंवा घरात एखादी छोटीशी बाग असावी असे वाटते. तर त्यात गुलाबाचे रोप लावतात.
गुलाबाची झाडे निरोगी राहण्यासाठी आणि फुले येण्यासाठी त्यांना भरपूर माती आणि खताची गरज असते.
तुमची बाग किंवा गुलाबाचे रोप फुलांनी भरलेली आणि सुंदर ठेवण्यासाठी तुम्ही खत तयार करू शकता.
घरात भाजीच्या वापरानंतर शिल्लक साले, देठ, अंड्याची कवच आणि चहाची पावडर हे सेंद्रिय खतासारखे काम करते. जे मातीत पोषक घटक वाढवते.
गांडुळांपासून बनवलेल्या कंपोस्ट खत हे पोषक आणि सूक्ष्मजीवांनी युक्त असते. जे गुलाबाच्या झाडाला भरपुर फुले देतात.
अंड्यामध्ये कॅल्शिअम असते जे मुळे मजबुत करते. यासाठी अंड्याचे कवच धुऊन वाळवून ते बारिक करून टाकावे.
गुलाबाच्या झाडाला भरपुर फुले येण्यासाठी केळीचे साल फार उपयुक्त असते. यापासून गुलाबाच्या झाडाला आवश्यक पोषक तत्वे मिळतात