Rose Farming Pune : गुलाब शेती नवा आदर्श, पुण्यातील शेतकऱ्याने असं केलं नियोजन

sandeep Shirguppe

गुलाबाच्या फुलांची मागणी

सध्या लग्न सराई आणि समारंभात गुलाबाच्या फुलांसाठी जगभरात मागणी आहे. पुण्यातील तळेगावमध्ये ४ एकरातील गुलाबाची शेती सगळ्यांना भूरळ घालत आहे.

Rose Farming Pune | agrowon

गुलाब लागवड

पुण्यातील मल्हार ढोले यांनी व्हॅलेंटाईन डे आणि लग्न सराईच्या दृष्टीने झाडांची लागवड केली आहे. २ ते ५ वर्षापर्यंत ही झाडे वाढली आहेत.

Rose Farming Pune | agrowon

पिकाचे नियोजन

यासाठी त्यांनी एकरी १ टन शेणखत आणि ५०० किलो सुपर फॉस्फेट खत मात्रा देत आहेत. तसेच बुरशीनाशकाची फवारणीही करत आहेत.

Rose Farming Pune | agrowon

निर्यातीचे नियोजन

१४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंटाइन डे’ निमीत्त आतापासूनच नियोजन सुरू आहे. सध्या २० रुपये प्रति फूल असा दर आहे.

Rose Farming Pune | agrowon

थंडीची गरज

निर्यातक्षम उत्पादनासाठी थंडीची गरज असते, यासाठी रात्रीचे तापमान १०, तर दिवसाचे तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंतची गरज सध्या आहे.

Rose Farming Pune | agrowon

थंडीने फायदा

तर झालेल्या पावसामुळे आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात बदल होत आहे. मात्र पुढील आठवड्यात चांगली थंडी पडून पोषक वातावरण निर्माण होईल, असा अंदाज आहे.

Rose Farming Pune | agrowon

निर्यातदारांना हवे मार्जिन

निर्यातदारांना किमान एका फुलामागे ५ रुपयांचे मार्जिन राहिले, तर ते फायदेशीर राहते. मात्र सध्या दोन रुपये मार्जिन असल्याने निर्यात थंडावली आहे.

Rose Farming Pune | agrowon

जानेवारीत मार्जीन

हीच निर्यात जानेवारी अखेरपासून फेब्रुवारीच्या सहा, सात तारखेपर्यंत वाढण्याचा ढोले यांचा अंदाज आहे. अधिक माहितीसाठी मल्हार ढोले यांचा संपर्क ९४२३२०४६५४

Rose Farming Pune | agrowon
sangamner goat | agrowon