Anuradha Vipat
वजन कमी करण्यासाठी योग्य आहाराची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते.
कंदमुळांमध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असतात असा एक समज आहे, परंतु काही विशिष्ट कंदमुळे फायबरने समृद्ध आणि कॅलरीजमध्ये कमी असतात.
रताळ्यामध्ये भरपूर फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि दीर्घकाळ भूक लागत नाही.
कमळाच्या मुळात कॅलरीज अत्यंत कमी असतात, परंतु फायबरचे प्रमाण प्रचंड असते. हे खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते.
गाजरामध्ये कॅलरीज कमी आणि व्हिटॅमिन 'ए' व फायबर मुबलक प्रमाणात असतात. हे शरीरातील पाचक रस वाढवून पचनक्रिया वेगवान करते.
बीट हे फॅट-फ्री आणि कमी कॅलरी असलेले कंदमूळ आहे. यात असणारे नायट्रेट्स वर्कआउट करताना तुमची स्टॅमिना वाढवतात, ज्यामुळे अधिक कॅलरीज बर्न होतात.
मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त आणि कार्बोहायड्रेट्स अतिशय कमी असतात. हे खाल्ल्याने शरीराला आवश्यक फायबर मिळते.