Anuradha Vipat
हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी योग्य आहाराचे सेवन करणे महत्त्वाचे आहे.
गाजर, बीट, रताळे, मुळा यांसारख्या भाज्या शरीराला ऊर्जा आणि पोषक तत्वे देतात.
पालक, मेथी, सरसो का साग या भाज्यांमध्ये लोह, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात
बदाम, अक्रोड, खजूर, अंजीर, शेंगदाणे आणि सूर्यफूलाच्या बिया हे स्निग्ध पदार्थ शरीरावा ऊर्जा देतात.
बाजरीच्या भाकरीचे सेवन करा. बाजरी शरीराला जास्त वेळ उबदार ठेवते
आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, आणि अति गोठवलेले अन्नपदार्थ खाणे टाळा. यामुळे सर्दी आणि घसादुखीचा धोका वाढतो.
अति तळलेले आणि जंक फूड पचनसंस्थेवर ताण देतात आणि शरीरातील जळजळ वाढवू शकतात.