Anuradha Vipat
उद्यावर आलेल्या बाप्पाच्या स्वागतासाठी भाविकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही बाप्पाप्रती भक्तीचा गजर केला आहे .
सध्या सोशल मीडियावर बाप्पाच्या आगमनाच्या पोस्ट, फोटो, सजावटीची पूर्वतयारी यांची माहिती देणारे व्हिडीओ ट्रेंड आहेत .
अनेकांनी तर व्हॉट्सअॅपवर डीपी बदलण्याबरोबरच गणरायाचे वेगळ्या प्रकराचे फोटो फॉवर्ड केले आहे .
गणपती बाप्पा हे हिंदू धर्मातील एक अत्यंत आदरणीय दैवत आहे. दरवर्षी भक्त बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात.
पण गणेशोत्सवातील प्रत्येक अपडेट सोशल मीडियामुळे माहिती पडते. सोशल मीडियाची भूमिका अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेली आहे
सोशल मीडिया तंत्रज्ञान लोकांना एकत्र आणते, नवीन संधी निर्माण करते. सोशल मीडियामुळे आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते.
सोशल मीडियामुळे गणेशोत्सव साजरे करण्याची नवीन पद्धत निर्माण झाली आहे,सोशल मीडियाद्वारे सणांच्या माहितीची देवाणघेवाण होते