Swapnil Shinde
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.
ही यात्रा बीड जिल्ह्यात दाखल झाली असून शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांची संवाद साधला.
या यात्रेदरम्यान, रोहित पवार यांनी कापशीच्या शेतीची पाहणी केली.
कापसाची वेचणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक पिण्याची परिस्थिती जाणून घेतली.
त्यांनी शेतकऱ्यांसोबत कापसाची वेचणी केली.
त्याचबरोबर शेतकऱ्यांसोबत बांधावर बसून दुपारीच न्याहारी केली
पावसाने खंड पडत्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने यावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.