Swarali Pawar
रोबोट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सेन्सरवर चालणारी स्मार्ट मशीन. ती ठराविक कामं स्वतः करते, जसे दूध काढणं, खाद्य देणं आणि गोठा स्वच्छ ठेवणं.
गायीच्या गळ्यातील RFID टॅगमुळे रोबोट तिची ओळख ओळखतो. रोबोटिक हात काही सेकंदात कप बसवून दूध काढतो तेही अगदी अचूक, स्वच्छ आणि जलद!
हा रोबोट ठराविक वेळी योग्य प्रमाणात खाद्य देतो. TMR प्रणालीमुळे प्रत्येक गायीला संतुलित आहार मिळतो आणि अपव्यय कमी होतो.
हा रोबोट ठराविक वेळेत गोठा स्वच्छ ठेवतो. स्वच्छतेमुळे दुर्गंधी कमी होते आणि आजारांचा धोका घटतो.
प्रत्येक गायीच्या हालचाली, आरोग्य व दूध उत्पादनाची माहिती सेन्सरद्वारे मिळते. ही माहिती संगणक प्रणालीत जाऊन गोठ्याचे व्यवस्थापन अधिक अचूक बनते.
रोबोट तंत्रज्ञान मजुर व वेळेची बचत करतात. स्वच्छ आणि अचूक कामकाज करतात. यासोबत गायींचं आरोग्य सुधारतात आणि दूध उत्पादनात सातत्य व वाढ मिळते.
नेदरलँड, डेन्मार्क, इस्रायलमध्ये हे तंत्रज्ञान नियमित वापरले जाते. १०० गायींसाठी फक्त दोन रोबोट्स पुरेसे ठरतात!
देशात रोबोटिक गोठ्यांची सुरुवात झाली आहे. भारतीय परिस्थितीला अनुरूप स्वदेशी रोबोट तयार होत आहेत अर्थात भविष्याचं पशुपालन स्मार्ट होतंय!