Swarali Pawar
टीएमआर मिक्सर हे जनावरांसाठी संतुलित खाद्य तयार करणारं यंत्र आहे. हे हिरवा चारा, सायलेज, खनिजे आणि पूरक द्रव्य योग्य प्रमाणात मिसळतं. यामुळे जनावरांचं आरोग्य सुधारतं आणि दूध उत्पादनात वाढ होते.
सायलेज सेन्सर मुरघासातील ओलावा आणि पोषण तपासतो. यामुळे खराब किंवा नापिक सायलेज जनावरांना देणे टाळता येतं. हा सेन्सर जनावरांच्या पचन आणि पोषण व्यवस्थापनात मदत करतो.
गोठ्यातील तापमान वाढले की सेन्सर सक्रिय होतात. ते फॅन आणि पाण्याचे फॉगर आपोआप सुरू करतात, ज्यामुळे जनावरांना थंडावा मिळतो. ही प्रणाली उष्णतेचा ताण कमी करून दूध उत्पादन टिकवून ठेवते.
हे केंद्र गोठ्यातील तापमान, आर्द्रता, वारा आणि पावसाचं मोजमाप करतं. याच्या मदतीने हवामानातील बदल समजतात आणि आवश्यक उपकरणं आपोआप चालू होतात. उष्णतेतून जनावरांचं संरक्षण यामुळे शक्य होतं.
हे तंत्रज्ञान उच्च वंशावळीच्या जनावरांच्या निर्मितीसाठी वापरलं जातं. जनावरांच्या प्रजननात लिंग नियंत्रण आणि भ्रूण प्रत्यारोपणामुळे उत्कृष्ट वंशावळ तयार होते. यामुळे दुधाळ, रोगप्रतिरोधक जनावरे तयार होतात.
गोठ्यातील शेणापासून बायोगॅस तयार होतो आणि त्याचा वापर वीज व स्वयंपाकासाठी होतो. सौरऊर्जा प्रणाली फॅन, दिवे आणि सेन्सर चालवते. या दोन्ही ऊर्जांमुळे खर्च कमी होतो आणि पर्यावरणपूरक ऊर्जा वापरली जाते.
आता काही डेअरींमध्ये दूध काढणं, खाद्य देणं आणि स्वच्छता ही कामं रोबोट करत आहेत. फक्त दोन रोबोट्स १०० गायींचं व्यवस्थापन करतात! यामुळे वेळ आणि मजुरीची बचत होते तसेच उत्पादन वाढतं.
ही अत्याधुनिक यंत्रं रक्त आणि दुधातील घटक तपासतात. ब्लड अॅनालायझर, सोमॅटिक सेल काउंटर आणि इलेक्ट्रोलाइट अॅनालायझरमुळे आजार लवकर ओळखले जातात. यामुळे जनावरांचं आरोग्य आणि दूध गुणवत्ता सुधारते.