Anuradha Vipat
पावसाळ्याच्या दिवसांत रिमझिम पावसात शेगडीवर भाजलेला आणि तिखट-मीठ-लिंबू लावलेला कणीस (भुट्टा) खाण्याची मजा काही वेगळीच असते
हा गावरान स्वाद घरच्या घरी गॅसवर अगदी २ मिनिटांत कसा आणायचा, याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहे.
१ किंवा २ ताजी गावरान कणसे, १ कापलेला लिंबू ,१ छोटा चमचा लाल तिखट, १ छोटा चमचा साधे मीठ किंवा काळं मीठ ,आधा छोटा चमचा.
सर्वात आधी कणसाची बाहेरील साले आणि केस (दोरे) पूर्णपणे काढून टाका. कणीस स्वच्छ करून घ्या
कणीस थेट गॅसच्या फ्लेमवर ठेवा. चिमट्याच्या साहाय्याने कणीस सतत गोल फिरवत राहा, जेणेकरून सर्व दाणे सारखे भाजले जातील
कणीस भाजेपर्यंत एका छोट्या वाटीत लाल तिखट, काळं मीठ, साधे मीठ आणि चाट मसाला एकत्र करून मिक्स करा.
कापलेला लिंबू तयार केलेल्या मसाल्याच्या वाटीत उलटा दाबून घ्या. मसाला लावलेला लिंबू गरमागरम भाजलेल्या कणसावर सर्व बाजूंनी व्यवस्थित चोळून घ्या .