sandeep Shirguppe
तज्ज्ञांच्या मते, शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी फार फायदेशीर आहेत.
या शेंगांमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन सी आणि अॅंटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात.
शेवग्याच्या शेंगा पचण्यासाठी हलक्या आहेत आणि यात फायबरचं प्रमाण जास्त असल्याने पचन क्रियाही सहज होते.
डायबिटीस रूग्णांसाठी शेवग्याच्या शेंगा वरदान मानल्या जातात. याने ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत मिळते.
व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने या शेंगा सर्दी-खोकलासारखे व्हायरल इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.
शेवग्याच्या शेंगा कॅल्शिअमचा स्त्रोत आहेत. म्हणजे यात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम आहे. जे हाडांना मजबूत करतं.
शेवग्याच्या शेंगामध्ये गाजराच्या दहापट ‘अ’ जीवनसत्त्व असते यामुळे शेवगाच्या शेंगांचे सेवन करावे.
आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा शेवगा आहारात घ्यावा, शेवग्याचे पदार्थ तयार करून लहान मुलांना द्यावे.