sandeep Shirguppe
फणस खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याचबरोबर त्याच्या बियाही आरोग्यदायी आहेत.
फणसात व्हिटॅमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्शियम, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असते.
फणसाच्या बियांमध्ये भरपूर फायबर आढळते, ज्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली काम करते.
फणसाच्या बियांचे सेवन केले तर ते तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते आणि तुम्हाला भूक लागत नाही.
फणसाच्या बियांमध्ये आढळणारे हेच व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स चयापचय वाढवण्यास मदत करते.
फणसाच्या बिया त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकतात.
फणसाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए आढळते जे डोळे आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे.
फणसाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते जे आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते.