Restaurant-Style Veg Kolhapuri : हॉटेलची चवही फिकी पडेल! अशा पद्धतीने घरीच बनवा झणझणीत व्हेज कोल्हापुरी

Anuradha Vipat

व्हेज कोल्हापुरी

झणझणीत, चमचमीत आणि लालबुंद तरी असलेली हॉटेल स्टाईल व्हेज कोल्हापुरी भाजी आता तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता.

Restaurant-Style Veg Kolhapuri | Agrowon

कोल्हापुरी मसाला

ही भाजी हॉटेलसारखी चवदार बनवण्याचे खरे गुपित म्हणजे फ्रेश तयार केलेला खास कोल्हापुरी मसाला.

Restaurant-Style Veg Kolhapuri | Agrowon

कोल्हापुरी मसाला साहित्य

सुकं खोबरं ,धने,जिरे,तीळ व खसखस,लवंग , मिरी , दालचिनी, हिरवी वेलची, बदाम फूल, बेडगी/काश्मिरी सुक्या लाल मिरच्या, काजू.

Restaurant-Style Veg Kolhapuri | Agrowon

भाज्या आणि ग्रेव्ही

फ्लॉवर, गाजर, फरसबी, हिरवे मटार - हलके उकडलेले किंवा तेलात परतून घेतलेले, पनीर आणि शिमला मिरची, कांदा,टोमॅटो प्युरी,आले-लसूण पेस्ट, कांदा-लसूण मसाला किंवा कोल्हापुरी चटणी, हळद व कसुरी मेथी,तेल आणि बटर, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.

Restaurant-Style Veg Kolhapuri | Agrowon

कोल्हापुरी मसाला

तेल न टाकता सुके खोबरे, धने, जिरे, तीळ, खसखस, काजू आणि अक्खे गरम मसाले मंद आचेवर खरपूस भाजून घ्या. सुक्या लाल मिरच्या टाकून हलक्या परतून घ्या. मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून अगदी मऊ वाटून घ्या. तुमचा कोल्हापुरी मसाला तयार आहे.

Restaurant-Style Veg Kolhapuri | Agrowon

भाज्या परतून घेणे

तेल किंवा बटर गरम करा. त्यात फ्लॉवर, गाजर, फरसबी, शिमला मिरची आणि पनीरचे तुकडे २-३ मिनिटे हाय फ्लेमवर परतून बाजूला काढून ठेवा त्याच कढईत उरलेले तेल आणि बटर गरम करा. तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा घालून तो छान सोनेरी रंगावर परता. नंतर आले-लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परता. यामध्ये हळद, कांदा-लसूण मसाला घाला. त्यानंतर आपण तयार केलेला कोल्हापुरी मसाल्याचे वाटप घालून पुन्हा २ मिनिटे परतून घ्या.

Restaurant-Style Veg Kolhapuri | Agrowon

भाजी एकत्र करणे

मसाला चांगला शिजल्यावर कढईत १ कप उकळते गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. ग्रेव्हीला उकळी आली की आपण परतून घेतलेल्या भाज्या, मटार आणि पनीरचे तुकडे त्यात टाका. मंद आचेवर झाकण ठेवून भाजी ५ ते ७ मिनिटे शिजू द्या. शेवटी कसुरी मेथी आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाका आणि गॅस बंद करा.

Restaurant-Style Veg Kolhapuri | Agrowon

Mango Leaf Toran : पूजा विधीत आंब्याच्या पानांचे तोरण का लावतात? जाणून घ्या मुख्य धार्मिक कारणे!

Mango Leaf Toran | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...