Anuradha Vipat
कोणत्याही शुभ कार्यात, सणासुदीला किंवा पूजा विधीमध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावणे अत्यंत पवित्र आणि मंगलमयी मानले जाते.
सनातन परंपरेनुसार, आंब्याचे झाड आणि त्याची पाने ही सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहेत.
धार्मिक मान्यतेनुसार घराच्या प्रवेशद्वारावर हे तोरण लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी, धन-धान्य आणि ऐश्वर्य येते.
आंबा हे भगवान हनुमानाचे अतिशय आवडते फळ मानले जात असल्याने, जिथे आंब्याची पाने असतात तिथे हनुमानाची विशेष कृपा राहते अशीही श्रद्धा आहे.
असे मानले जाते की, प्रवेशद्वारावर लावलेले तोरण घरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि अमंगल शक्तींना दाराबाहेरच रोखते .
आंब्याचे झाड हे वर्षभर हिरवेगार राहणारे आणि दीर्घायुषी झाड आहे, त्यामुळे ते वंशवृद्धी, दीर्घायुष्य आणि सातत्यपूर्ण प्रगतीचे प्रतीक मानले जाते.
कलशावरील नारळ हे देवाचे शीर आणि आंब्याची पाने हे देवाचे अवयव मानले जातात. या पानांमुळे पूजा विधी पूर्ण आणि सिद्ध होतो.