Shev Bhaji Recipe : रेस्टॉरंट स्टाईल झणझणीत शेवभाजी बनवा घरच्या घरी, पाहा रेसिपी

Anuradha Vipat

रेसिपी

झणझणीत आणि तरीबाज रेस्टॉरंट स्टाईल शेवभाजी घरच्या घरी बनवण्यासाठी खालील रेसिपी फॉलो करा.

Shev Bhaji Recipe | Agrowon

साहित्य

शेव, कांदा,टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, सुकं खोबरं, कांदा-लसूण मसाला, लाल तिखट,हळद, गरम मसाला किंवा गोडा मसाला, तेल , मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि कोथिंबीर. 

Shev Bhaji Recipe | Agrowon

कृती

किसलेले खोबरे आणि कांदा तव्यावर थोडे तेल टाकून गुलाबी रंगावर भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या. गरम तेलात मोहरी, जिरे आणि कढीपत्ता , आलं-लसूण पेस्ट घालून परता. 

Shev Bhaji Recipe | Agrowon

मसाले परतणे

कांदा-खोबरं पेस्ट तेलात घाला. त्यानंतर टोमॅटो पेस्ट घालून २-३ मिनिटे शिजवा. हळद, लाल तिखट, कांदा-लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ टाका. 

Shev Bhaji Recipe | Agrowon

रस्सा

मसाल्याला  २-३ वाट्या गरम पाणी घाला. रस्स्याला उकळी आल्यावर मध्यम आचेवर ५-७ मिनिटे उकळू द्या. शेवटी गरम मसाला आणि कोथिंबीर टाका.

Shev Bhaji Recipe | Agrowon

सर्व्ह करण्याची पद्धत

शेवभाजीमध्ये कधीही आधी शेव टाकू नका, कारण शेव लगेच पाणी शोषून घेते आणि भाजीचा लगदा होतो.

Shev Bhaji Recipe | Agrowon

सर्व्ह

जेव्हा जेवायला बसाल तेव्हा वाटीत गरम रस्सा घ्या आणि वरून जाड शेव टाकून सर्व्ह करा.

Shev Bhaji Recipe | Agrowon

Mangalwar Hanuman Puja : मंगळवारी हा गुप्त उपाय करुन पाहा थांबणार नाही पैशांचा ओघ

Mangalwar Hanuman Puja | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...