Anuradha Vipat
मंगळवार हा दिवस हनुमानजींच्या उपासनेसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो.
जर तुमच्या कामात अडथळे येत असतील किंवा आर्थिक चणचण भासत असेल तर मंगळवारी हा एक 'गुप्त उपाय' श्रद्धेने करून पाहा.
मंगळवारी रात्री हनुमानजींसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्या दिव्यात दोन अख्खी लवंग टाका.
मंगळवारी सकाळी अंघोळ केल्यावर पिंपळाची ११ पाने स्वच्छ धुवून त्यावर चंदनाने 'श्री राम' लिहा. या पानांची माळ बनवून हनुमानजींच्या मंदिरात अर्पण करा.
एक नारळ घेऊन त्यावर सिंदूराने स्वस्तिक काढा. हा नारळ हनुमानजींच्या चरणी अर्पण करा आणि 'ऋणमोचक मंगल स्तोत्र' पठण करा.
मंगळवारी हनुमानाला चमेलीचे तेल आणि शेंदूर अर्पण केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते .
हे उपाय करताना पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करा. हा उपाय कोणालाही सांगू नका.