Global Warming Himalaya : तर दुष्काळाचा हिमालयावर ९० टक्के परिणाम संशोधकांचा अहवाल

sandeep Shirguppe

तर हिमालयावर परिणाम

देशातील अनेक भागांना यंदा दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. याचा थेट परिणाम हिमालयावर पडण्याची शक्यता आहे.

Global Warming | agrowon

जागतिक तापमान

जागतिक तापमान तीन अंश सेल्सिअसने वाढल्यास हिमालयातील ९० टक्के भागांत वर्षभरापेक्षा अधिक काळ टिकणारा दुष्काळ पडू शकतो.

Global Warming | agrowon

संशोधकांचे मत

ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अॅग्लियामधील संशोधकांनी हे संशोधन केले. त्याचे निष्कर्ष 'क्लायमेट चेंज' या नियतकालिकात प्रकाशित झाले.

Global Warming | agrowon

जागतिक तापमानवाढ

भारताने जागतिक तापमानवाढ कमी करण्याच्या पॅरिस कराराचे पालन केल्यास देशातील उष्णता ८० टक्क्यांनी कमी होईल, असाही संशोधकांचा दावा आहे.

Global Warming | agrowon

पॅरिस करार

पॅरिस करारात जागतिक तापमानवाढ दीड अंश सेल्सिअसच्या मयदित ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.

Global Warming | agrowon

संशोधकांचा एकत्रीत अभ्यास

संशोधकांनी भारतासह ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया आणि घाना या देशांवर यासंदर्भात केलेल्या आठ संशोधनांचा एकत्रित अभ्यास केला.

Global Warming | agrowon

धोका टळू शकतो

जागतिक तापमानवाढ ३ ते ४ अंश सेल्सिअसदरम्यान असल्यास भारतातील परागीभवन निम्म्याने व ती दीड अंश सेल्सिअस झाल्यास ते एक चतुर्थांशपर्यंत कमी होईल.

Global Warming | agrowon

तीव्र दुष्काळ

जागतिक तापमान तीन अंशांनी वाढल्यास भारतासह वरील प्रत्येक देशांत एक वर्षापासून तीस वर्षांपर्यंत टिकणारा तीव्र दुष्काळ पडू शकतो.

Global Warming | agrowon

तर हिमालयाला धोका

देशातील हिमालयातील ९० टक्के भागालाही दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो.

Global Warming | agrowon

सहा देशांना धोका

दीड अंशांपर्यंतच्या जागतिक तापमानवाढीमुळे भारतासह सहा देशांना तीन अंश सेल्सिअस तापमानवाढीच्या तुलनेत तीव्र दुष्काळाचा धोका २,०८० टक्क्यांनी कमी होईल.

Global Warming | agrowon

तर भारताला मोठा धोका

वाढत्या लोकसंख्येचा विचार करता या देशांतील अनेक भागांना दीड अंश सेल्सिअस तापमानवाढीचाही धोका आहे, याकडेही संशोधकांनी लक्ष वेधले.

Global Warming | agrowon
आणखी पाहा...