Anuradha Vipat
कपड्यांवर जेवताना किंवा स्वयंपाक करताना तेलाचे डाग पडणे ही एक सामान्य समस्या आहे.
कपड्यावर ज्या ठिकाणी तेलाचा डाग पडला आहे, तिथे थोडे भांडी घासण्याचे लिक्विड टाका. डागाच्या भागावर हलक्या हाताने गोलाकार मसाज करा. ५ ते १० मिनिटे तसेच राहू द्या
तेलाचा डाग पडलेल्या भागावर बेकिंग सोड्याची पावडर जाड थरामध्ये पसरवून टाका. ३0 ते ४५ मिनिटे सोडा तसाच कोरडा राहू द्या.
कपड्यावर तेल पडल्या पडल्या लगेच त्यावर घरातील कोणतीही टॅल्कम पावडर किंवा कॉर्नस्टार्च भरपूर प्रमाणात टाका. पावडर तेलाला कापडाच्या आत जाण्यापूर्वीच स्वतःमध्ये शोषून घेते.
लिंबाचा रस थेट डागावर पिळा आणि त्यावर थोडे साधे मीठ टाका. टूथब्रशच्या मदतीने डाग असलेल्या भागावर हलके घासा. १० मिनिटे उन्हात किंवा हवेत सुकू द्या
व्हिनेगर हट्टी डाग काढून टाकण्यासाठी आणि कपड्यांची दुर्गंधी घालवण्यासाठी उत्तम मानले जाते.
सुती किंवा जाड कपड्यांवरील तेलाचे डाग काढण्यासाठी कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करा. गरम पाण्यामुळे तेल लवकर विरघळते.