Anuradha Vipat
आयुर्वेदानुसार कांदा हा उष्णता शोषून घेणारा आणि शरीराला थंडावा देणारा मानला जातो.
उन्हाळ्यात कच्चे कांदे खाणे किंवा त्याचा वापर करणे उष्माघातापासून रक्षण करण्यासाठी रामबाण उपाय ठरते.
उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील अंतर्गत तापमान संतुलित राहते आणि शरीराला अचानक वाढणाऱ्या उष्णतेचा फटका बसत नाही.
उन्हाळ्याच्या दिवसांत वाहणाऱ्या कोरड्या आणि गरम वाऱ्यांमुळे शरीरातील पाण्याचे शोषण होते. कांद्यामध्ये असणारे 'क्वेर्सेटिन'हे घटक शरीराला उन्हाच्या तीव्रतेशी लढण्याची ताकद देतात.
उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील आवश्यक क्षार बाहेर पडतात. कांद्यामध्ये पोटॅशियम आणि सोडियमचे चांगले प्रमाण असते, जे शरीरातील पाण्याचे आणि रक्ताचे प्रमाण टिकवून ठेवतात.
उन्हाळ्यात जठराग्नी मंदावतो, ज्यामुळे अपचन किंवा गॅसचा त्रास होतो. कांद्यामध्ये फायबर असते, जे पोटाला थंडावा देऊन पचनशक्ती मजबूत करते.
दुपारच्या जेवणामध्ये कच्चा कांदा बारीक चिरून त्यावर थोडे काळे मीठ आणि लिंबाचा रस टाकून खावा.