Anuradha Vipat
लहान मुले भिंतीवर पेन्सिल, पेन किंवा क्रेयॉन्सने नक्षीकाम करतात, ज्यामुळे भिंती खराब दिसू लागतात.
घरच्या घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंनी तुम्ही या खुणा सहज काढू शकता. खालील काही प्रभावी टिप्स फॉलो करा.
भिंतीवरील डागावर थोडी पेस्ट लावून कापडाने किंवा जुन्या टूथब्रशने हलक्या हाताने घासा. त्यानंतर ओल्या कापडाने भिंत पुसून घ्या.
बेकिंग सोडा आणि थोडे पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागांवर लावा यामुळे भिंतीचा रंग न निघता डाग सहज निघतात.
पेन्सिलच्या खुणा असतीलतर साध्या रबरने त्या पुसण्याचा प्रयत्न करा.
कोमट पाण्यात थोडे भांडी घासण्याचे लिक्विड टाका. स्पंज या पाण्यात भिजवून भिंतीवरील डाग पुसा.
जर खुणा मेणबत्तीच्या खडूंच्या असतील, तर हेअर ड्रायरने त्या डागावर गरम हवा सोडा.