sandeep Shirguppe
हिवाळ्यात रेफ्रिजरेटरचा वापर क्वचितच केला जातो, परंतु बर्याच वेळा खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये बराच वेळ ठेवल्याने फ्रीजला दुर्गंधी येते.
फ्रीज साफ करूनही वास संपत नाही, ही समस्या बहुतेकांना भेडसावत असते.
या रेफ्रिजरेटरच्या दुर्गंधीमुळे हैराण असाल, तर तुम्हाला या टिप्स उपयोगी पडतील.
झाकण लावून अन्न न ठेवल्याने संपूर्ण फ्रीजला दुर्गंधी येते.
अनेक वेळा अन्न, दूध किंवा इतर अनेक वस्तू फ्रीजमध्ये पडतात. लगेच साफसफाई न केल्यामुळे बॅक्टेरिया तयार होतात.
फ्रिजमधून येणार्या दुर्गंधीची समस्या ब्रेडमुळे कमी होऊ शकते. यासाठी पॅकेटमधून 2-3 ब्रेड काढून फ्रीजमध्ये ठेवा.
दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी फ्रीज साफ केल्यानंतर संत्र्याची सालही फ्रीजमध्ये ठेवता येते.
पुदीना वास आणणाऱ्या बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करते, फ्रिज ताजे आणि दुर्गंधीमुक्त ठेवते.
पुदिन्याची पाने मिक्सरमध्ये बारीक करून त्यांचा रस काढून पाण्यात मिसळा. या द्रवाने फ्रीज स्वच्छ केल्यास वास जाईल.