Rabi Onion : रबी कांदा लागवडीची ही सुत्रे लक्षात ठेवा

Team Agrowon

जमीन

कांदा लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. शेताची उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडावीत. त्यानंतर वखरणी करून जमीन भुसभुशीत करावी. 

Rabi Onion | Agrowon

रोपांची पुनर्लावड

जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रोपांची पुनर्लावड करावी. लागवडीपूर्वी सपाट वाफ्यात हलके पाणी देऊन नंतरच लागवड करावी.

Rabi Onion | Agrowon

वाफे तयार करणे

चांगलं कुजलेलं शेणखत हेक्टरी १५ ते २० टन प्रमाणे जमिनीत मिसळावं. त्यानंतर पुन्हा वखराची एक पाळी द्यावी. लागवडीसाठी २ मीटर रुंद व ३ ते ४ मीटर लांब वाफे तयार करावेत. 

Rabi Onion | Agrowon

बीबीएफ पद्धत

ठिबक सिंचनाची सोय असल्यास १.२० मीटर रुंदीचे बीबीएफ पद्धतीने वाफे तयार करावेत. लागवडीसाठी ६ ते ८ आठवडे वयाच्या कांदा रोपांची निवड करावी.

Rabi Onion | Agrowon

रोगाचा प्रादुर्भाव

रोपांच्या पुनर्लागवडीनंतर रोपांवर माना टाकणाऱ्या रोगाचा म्हणजेच डॅंपिंग ऑफ रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गांडूळ खत किंवा कुजलेल्या शेणखतात मिसळून प्रति गादीवाफा २५ ते ३० ग्रॅम ट्रायकोडर्माचा वापर करावा. 

Rabi Onion | Agrowon

खतमात्रा

सपाट व बीबीएफ वाफ्यावर १५ बाय १० सें.मी. अंतरावर रोपांची लागवड करावी. कांदा रोपांना जास्त प्रमाणात खतमात्रा लागते. त्यासाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश याप्रमाणे खतमात्रा द्यावी. 

Rabi Onion | Agrowon

पाणी व्यवस्थापन

लागवडीवेळी संपूर्ण स्फुरद आणि पालाश व ५० किलो नत्र द्यावं. नत्राची उर्वरित मात्रा लागवडीनंतर ३० व ४५ दिवसांनी द्यावी. खते दिल्यानंतर पिकाला हलकं पाणी द्यावं.

Rabi Onion | Agrowon
Agrowon