Remedies On Rats : घरात उंदरांचा सुळसुळाट? हा उपाय करा उंदीर न मरताच जातील घराबाहेर

Aslam Abdul Shanedivan

उंदरांचा सुळसुळाट

आपल्या घरात आणि परिसरात उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. तेंव्हा आपण अनेक उपाय करत असतो. पण आपल्या यश मिळत नाही. त्यावर आता हे उपाय करावे लागतील...

Remedies On Rats | Agrowon

उंदरांना घराबाहेर काढणारे औषध

आपल्या घरातून उंदरांना घराबाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी एक रुमाल, एक वाटी, गव्हाचं पीठ, कापूर, लाल मिरची पावडर, आणि शॅम्पू हे साहित्य लागेल.

Remedies On Rats | Agrowon

पीठ लाल तिखट आणि शॅम्पूचे मिश्रण

या साहित्यापासून औषध तयार करताना एका वाटीत एक ते दीड चमचा गव्हाचं पीठ, लाल तिखट आणि शॅम्पूचे मिश्रण तयार करून घ्या.

Remedies On Rats | Agrowon

उंदरांचा वावर

हे तयार मिश्रण हॅन्ड ग्लोज वापरून रुमालावर लावून घ्या. त्यावर कापूरची पूड तयार करून ती पसरवून घ्या. यानंतर हा रूमाल जेथे उंदीर अधिक असतात तेथे ठेवा. यानंतर उंदरांचा वावर कमी होईल

Remedies On Rats | Agrowon

तंबाखूचा वापर

उंदरांना घरातून बाहेर काढण्यासाठी तंबाखूचा वापरही करता येतो. यासाठी बेसनपीठ किंवा गव्हाच्या पिठात तंबाखू मिसळून त्याचे गोळे तयार करावेत. आणि ते उंदीर खातील अशा ठिकाणी ठेवावेत.

Remedies On Rats | Agrowon

तुरटी

घरातील उंदरांना बाहेर काढण्यात तुरटी उपयोगी पडू शकते. तुरटीची पेस्ट उंदरांच्या बिळाजवळ ठेवल्यास ते बाहेर येत नाहीत

Remedies On Rats | Agrowon

कांदा

कांद्याचा वास हा उग्र असतो. यामुळे कांद्याचे ७ ते ८ तुकडे उंदरांच्या वावराच्या ठिकाणी टाकल्यास ते घरातून निघून जातील.

Remedies On Rats | Agrowon

Animal Care : दुधाळ जनावरांना कसा आहार द्याल?