Anuradha Vipat
नवरात्रीच्या पवित्र नऊ दिवसांमध्ये अखंड ज्योत विझणे अत्यंत अशुभ मानले जाते.
शास्त्रानुसार अखंड दिवा विझल्यास घाबरून न जाता लगेचच क्षमा प्रार्थना करावी आणि काही सोपे ज्योतिषीय उपाय करावेत.
दिवा विझल्याचे समजताच वेळ न घालवता तो दिवा स्वच्छ कापसाची वात लावून पुन्हा प्रज्वलित करा.
जर मुख्य दिवा विझला असेल, तर आरतीचा दिवा किंवा कापूर लावून त्या ज्योतीने अखंड दिवा पुन्हा पेटवावा.
दिवा पुन्हा प्रज्वलित केल्यानंतर देवी दुर्गा मातेसमोर हात जोडून बसून क्षमा प्रार्थना करावी. "हे माता दुर्गे, अज्ञानामुळे किंवा माझ्याकडून झालेल्या चुुकीमुळे हा दिवा विझला आहे. माझी ही चूक क्षमा कर आणि माझ्या कुटुंबावर तुझी कृपा कायम ठेव."
दिव्याच्या दोषाचे निवारण करण्यासाठी त्याच दिवशी 'दुर्गा चालीसा' किंवा 'अर्गला स्तोत्र' चा पाठ करावा.
नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला लहान मुलींना घरी बोलवून त्यांना खीर-पुरीचा प्रसाद द्यावा. तसेच लाल रंगाचे कपडे किंवा फळे दान करावीत.