Anuradha Vipat
कमी बजेटमध्ये नवरात्रीसाठी स्टायलिश दिसायचे असेल, तर नवीन कपडे खरेदी करण्याची अजिबात गरज नाही.
तुमच्या कपाटात असलेल्या जुन्या साड्या, ओढण्या आणि कुर्ता-पायजमा यांचा वापर करून तुम्ही एक अतिशय आकर्षक आणि ट्रेंडी 'गरबा लुक' तयार करू शकता.
तुमच्याकडे एखादी जुनी काठपदर किंवा सिल्कची साडी असेल, तर तिचा वापर करून घेरदार लॉन्ग स्कर्ट किंवा लॅन्गा तयार करा. या स्कर्टवर एखादा साधा ब्लॅक, व्हाईट किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा क्रॉप टॉप किंवा शर्ट परिधान करा.
साध्या कुर्त्यावर किंवा क्रॉप टॉप-स्कर्टवर ही ओढणी गुंफून घ्या आणि त्याला एका छानशा कंबरपट्ट्याने लॉक करा.
पांढऱ्या शर्टसोबत जुना घागरा किंवा स्कर्ट घाला. शर्टची समोरील बटणे उघडी ठेवून आत क्रॉप टॉप घाला किंवा शर्टला समोरून नॉट मारा.
एका साडीचा घेरदार स्कर्ट बनवा आणि दुसऱ्या साडीचा मोठा पदर ओढणीसारखा वापरा. ब्लाउजसाठी तुम्ही कोणताही कॉन्ट्रास्ट किंवा मिरर वर्क असलेला रेडीमेड ब्लाउज वापरू शकता.
जुन्या साध्या सिल्क कुर्त्यावर किंवा क्रॉप टॉपवर भरपूर चांदीच्या बांगड्या, मोठे कानातले, चोकर नेकलेस आणि पायात घुंगरू असलेली पैंजण घाला.