Anuradha Vipat
कधीकधी रागाच्या भरात किंवा अनावधानाने बोललेली काही वाक्ये जोडीदाराच्या मनाला खोलवर जखम करू शकतात.
'नेहमी' आणि 'कधीच नाही' यांसारखे शब्द जोडीदाराला वाटते की तुम्ही त्यांच्या चांगल्या प्रयत्नांची दखल घेत नाही आहात.
जोडीदाराची तुलना तुमच्या भूतकाळातील व्यक्तीशी करणे हे कोणत्याही नात्यासाठी सर्वात घातक ठरू शकते.
वाद झाल्यावर संवाद पूर्णपणे बंद करणे किंवा "तुला काय करायचं ते कर" असं म्हणून सोडून देणे नात्यात दुरावा निर्माण करते.
मी तुझ्याशी लग्न करून चूक केली हे वाक्य जोडीदाराला खूप मानसिक त्रास देऊ शकते.
जोडीदाराच्या कुटुंबाचा किंवा पालकांचा अपमान करणे नात्यात कडवटपणा आणते.
माझ्या आयुष्यात तुझी गरज नाही हे वाक्य नात्याचा पाया कमकुवत करतं.