Anuradha Vipat
लग्नानंतर नवीन घरात जुळवून घेताना नात्यात गोडवा टिकवण्यासाठी मुलींनी जाणीवपूर्वक काही गोष्टी टाळणे हिताचे ठरते.
नवीन कुटुंबाच्या आवडीनिवडी जपताना स्वतःचे छंद, करिअर किंवा आवडी बाजूला सारू नका.
आपल्या माहेरच्या लोकांशी किंवा इतर कोणाच्या संसाराशी सासरच्या लोकांची तुलना करणे टाळा.
छोट्या-मोठ्या कुरबुरी दोन्ही घरी सांगत बसल्याने गैरसमज वाढतात.
लग्नानंतर लगेच जोडीदाराला किंवा सासरच्या लोकांना आपल्या मनाप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न करू नका.
जर एखादी गोष्ट आवडली नसेल, तर मनातल्या मनात रागावण्यापेक्षा जोडीदाराशी शांतपणे संवाद साधा.
पती-पत्नीमधील खासगी गोष्टी किंवा वाद तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार नाहीत याची काळजी घ्या.