Anuradha Vipat
पालक न खाणारी मुलेही हा चविष्ट आणि कुरकुरीत पालक डोसा आवडीने खातील! हा नाश्ता जितका पौष्टिक आहे तितकाच बनवायला सोपा आहे.
पालक, डोसा पीठ, हिरव्या मिरच्या, आलं, जिरे, मीठ, बटर किंवा तूप.
पालक, हिरव्या मिरच्या, आलं आणि जिरे मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या. ही पालकाची हिरवी प्युरी तुमच्या डोसा पिठात मिसळा. चवीनुसार मीठ घालून मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.
नॉन-स्टिक तवा गरम करून त्याला थोडे तेल किंवा तूप लावा. तव्यावर पळीने पीठ पसरवून पातळ डोसा बनवा.
डोशाच्या कडेने थोडे बटर किंवा तूप सोडा. मध्यम आचेवर डोसा कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्या
डोसा भाजत असताना वरून थोडे चीझ किंवा किसलेला पनीर टाका, मुले हा डोसा अगदी आवडीने खातील.
डोशाच्या आतमध्ये बटाट्याची भाजी किंवा कांदा-टोमॅटोचे सारण भरून तुम्ही 'पालक मसाला डोसा' देखील बनवू शकता