Aslam Abdul Shanedivan
आपल्याला आपले जीवन निरोगी आणि उत्साही जगायला असेल तर आधी आपले शरीर उत्तम असणे गरजेचे आहे.
यासाठीच तज्ज्ञांकडून सकाळी सकाळी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तर काही झाडांची पाने देखील चावून खाण्याचा सल्ला दिला जातो
शेवगा ज्याला मोरिंगा, ड्रमस्टिक असेही म्हटले जाते. जे औषधी तत्वांनी समृद्ध असून शेवग्याच्या पानांचे पाणी रोज प्यायल्यास अनेक आजार बरे होतात
तर शेवग्यांची पाने नियमित खाल्ल्याने निरोगी आणि उत्साही जीवन जगायला मदत होते.
शेवग्यांच्या पानात विटामिन्स ए,सी,ई, आणि बी-कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन आणि फायबर असते. याच्या सोवनाने आरोग्य चांगले रहाते.
सांधेदुखी, संधिवात, हाडांच्या समस्यांपासून दूर ठेवण्याचे काम शेवग्यामधील अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म करतात. ज्यामुळे जळजळ कमी होते आणि वेदना कमी होतात.
शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि दृष्टी तीक्ष्ण करत डोळ्यांच्या समस्या दूर करते.