Aslam Abdul Shanedivan
भारतातील प्रत्येक स्वयंपाक घरात मिळणारी हिरवी तिखट मिरची आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानली जाते.
हिरवी मिरचीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. दिवसातून एक मिरची नियमित खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
हिरव्या मिरचीमध्ये आढळणारे कॅप्सेसिन हे अँटीडायबेटिकचे काम करते. जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
मिरचीचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असून यातील व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
हिरवी मिरची व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत असून ती खाल्यास तोंडात जास्त लाळ निर्माण होते. यामुळे एन्झाइम्स तयार होऊन पचनक्रिया अधिक सक्रिय होते.
हिरवी मिरचीमुळे चयापचय वेगाने वाढवते, ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते.
याशिवाय हिरव्या मिरचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचेवरील मुरुम दूर करण्यास मदत करतात.