sandeep Shirguppe
पिवळ्या हळदीपेक्षा जास्त औषधी गुणधर्म काळ्या हळदीत असतात, आरोग्याचा खजिना असे मानले जाते.
हळदीचा रंग आतून जांभळा असतो. यामुळे अनेक आजार बरे होऊ शकतात. चला जाणून घेऊया काळ्या हळदीचे फायदे
काळ्या हळदीत कर्क्युमिन असल्याने इन्सुलिन सुधारते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहते.
यामध्ये कर्क्यूमिनसोबत अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. याने रक्त प्रवाह नियंत्रीत राहतो.
ऑस्टियोआर्थरायटिसच्या समस्येवर काळी हळद फायदेशीर ठरू शकते. याच्या सेवनाने सांधे आणि गुडघेदुखीपासून आराम मिळू लागतो.
काळ्या हळदीतील फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून तुमचे रक्षण करते. त्यामुळे कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराचा धोका कमी होतो.
काळी हळद पचनसंस्थेसाठीही फायदेशीर आहे. यामध्ये फायबरचे प्रमाण असते ज्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात.
कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा जखम असल्यास काळी हळद बारीक करून पेस्ट बनवा आणि प्रभावित भागावर लावा. यामुळे जखम भरून निघते.