Swapnil Shinde
गेल्या काही वर्षांत देशामध्ये मोठ्या प्रमाणात देशी गोवंशाला प्रोत्साहन दिले जात आहे.
राष्ट्रीय पशु अनुवांशिक संसाधनच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील देशी गोवंशाचे रजिस्ट्रेशन केले जात आहे.
हरियाणा, केनकाथा आणि खेरीगड या उत्तर प्रदेशच्या नोंदणीकृत जाती बनवण्यात आल्या.
बछौर जातीची बिहारसाठी नोंदणी केली गेली
अमृतमहाल, हल्लीकर जातीचा गोवंश कर्नाटक राज्यात आढळतो
आपल्या देशी गोवंशांमध्ये दूध उत्पादनासाठी गीर गाईला पसंती दिली आहे. ती गुजरात, राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच कांकरेज ही जातही गुजरातसाठी नोंदणीकृत झाली आहे.
खिल्लार गाय ही शुद्ध भारतीय गोवंश असून, प्रामुख्याने महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यांमध्ये आढळते. त्याचबरोबर गवळव आणि डांगी जातीच्या गायींची महाराष्ट्रात नोंदणी झाली आहे