Fruit Juice At Home : हॉटेलसारखा घट्ट आणि टेस्टी फ्रूट ज्यूस आता बनवा घरीच; जाणून घ्या सोप्या रेसिपीज

Anuradha Vipat

अत्यंत फायदेशीर

उन्हाळा असो वा हिवाळा, ताजे आणि थंडगार फ्रूट ज्यूस शरीराला ऊर्जा देतात आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

Fruit Juice At Home | Agrowon

'मॅंगो शेक

आंब्याची साले काढून त्याचे लहान तुकडे करून घ्या. आंबा, साखर आणि थोडे पाणी/दूध घालून चांगले वाटून घ्या. दूध आणि बर्फ घालून पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घ्या.

Fruit Juice At Home | agrowon

'टरबूज ज्यूस'

मिक्सरमध्ये टरबूजाचे तुकडे आणि पुदिन्याची पाने घालून पाणी न घालता ब्लेंड करा. वरून लिंबाचा रस आणि काळे मीठ घालून मिक्स करा. पुदिन्याचे पान लावून सजवा.

Fruit Juice At Home | agrowon

'मोसंबी किंवा संत्रा ज्यूस'

मोसंबी/संत्र्याची साले काढून घ्या आणि आतील बिया पूर्णपणे काढून टाका . मिक्सरच्या ज्युसर जारमध्ये फोडी, साखर आणि बर्फ घालून फक्त ३० ते ४० सेकंद फिरवा वरून काळे मीठ टाका.

Fruit Juice At Home | agrowon

'सफरचंद आणि गाजर ज्यूस'

सफरचंद आणि गाजर स्वच्छ धुवून, सोलून त्यांचे बारीक तुकडे करा. सफरचंद, गाजर, आले आणि अर्धा कप पाणी घालून गुळगुळीत पेस्ट बनवा. हा रस गाळून घ्या, त्यात थोडे लिंबू पिळा.

Fruit Juice At Home | agrowon

'अननस ज्यूस'

अननसाचे तुकडे मिक्सरमध्ये थोडे पाणी आणि साखर घालून चांगले बारीक करून घ्या. ग्लासमध्ये ज्यूस काढून वरून चाट मसाला आणि बर्फाचे तुकडे टाकून सर्व्ह कर

Fruit Juice At Home | agrowon

चव

संत्री, मोसंबी किंवा लिंबाचा ज्यूस बनवताना बिया पूर्णपणे काढून टाका आणि मिक्सर जास्त वेळ चालू ठेवू नका.

Fruit Juice At Home | agrowon

Stop Nail Biting : नखे कुरतडण्याच्या सवयीने त्रस्त आहात? आजच ट्राय करा 'या' सोप्या ट्रिक्स

Stop Nail Biting | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...