Aslam Abdul Shanedivan
आपल्याला सुंदर शरीर आणि आयुष्य हवे असेल तर आधी विविध आजारांपासून दूर राहावे लागेल.
सर्वात आधी आहार आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर राहत वाढता लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे
असे झाल्यास लठ्ठपणाच कमी होणार नाही तर शुगर आणि हाय ब्लड प्रेशरसारखे धोकादायक आजारही शरीरातून जातील.
यासाठी फळांसह सुका मेव्यासह अरोग्य दायक आहाराचे सेवन करायला हवं. तरच लठ्ठपणा खूप लवकर कमी होईल.
तर लठ्ठपणा वाढण्यामागे बैठी नोकरी, जंक फूड, व्यायाम न करणे यामुळे लठ्ठपणा उद्भवतो. तसेच तो साखरेचे सेवन आणि मिठाचा वापराने ही वाढतो.
दररोज साखरेचे सेवन केल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढून शुगर आणि हाय ब्लड प्रेशर उद्भवू शकते. यासाठी चहातून साखर काढून टाकण्याबरोबर बाहेरचे खाणे पिणे बंद करावे.
तर दररोजच्या जीवनात मीठाचा वापर अधिक केल्यास उच्च रक्तदाबाची समस्येसह सूज येण्याच्या समस्या उद्भवू शकते. यासाठी आहारात मीठाचा वापर WHO च्या निकषाप्रमाणे करा.