Anuradha Vipat
जास्त गोड खाल्ल्याने अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. गोड खाणे आरोग्यासाठी घातक आहे असं असूनही आपल्याला गोड खाण्याची इच्छा होतेचं.
गोड खाण्याची इच्छा कमी करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी करता येतील ते आजच्या या लेखात आपण पाहूयात.
भरपूर पाणी प्यायल्याने गोड खाण्याची इच्छा कमी होऊ शकते.
तणावामुळेही गोड खाण्याची इच्छा वाढते. त्यामुळे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहते आणि गोड खाण्याची इच्छा कमी होते.
फळे, भाज्या आणि इतर पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करा.
गोड खाण्याची इच्छा झाल्यावर लगेच खाऊ नका.