Swarali Pawar
हे रंगीत प्लास्टिक किंवा कार्डबोर्डचे फलक असतात. त्यावर चिकट पदार्थ लावलेला असतो आणि किडी त्यावर अडकतात.
किडींची संख्या कमी होते आणि प्रादुर्भाव लवकर समजतो. फवारणीचा खर्च कमी होऊन उत्पादन चांगले मिळते.
मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे यासाठी उपयुक्त. भाजीपाला व फळपिकांत जास्त वापर होतो.
फुलकिडे व पाने पोखरणाऱ्या अळीचे पतंग पकडण्यासाठी वापरतात. मिरची, कांदा, फुलपिकांसाठी फायदेशीर ठरतात.
उडद्या भुंगेरे व काही ढेकूणवर्गीय किडींसाठी उपयोगी. कापूस व कडधान्य पिकांत वापर करता येतो.
भाजीपाला पिकांसाठी १० ते ४० सापळे प्रति एकर लावावेत. कापूस व कडधान्यासाठी ३६ ते ८० सापळे प्रति एकर पुरेसे असतात.
किडीच्या प्रकारानुसार पिकाच्या उंचीप्रमाणे सापळे लावावेत. ओळीपासून २० सेंमी अंतर ठेऊन वाऱ्याची दिशा लक्षात घ्यावी.
७ ते १० दिवसांनी सापळे स्वच्छ करून पुन्हा चिकट पदार्थ लावावा. चिकट सापळे वापरल्यास किड नियंत्रण सोपे, स्वस्त आणि सुरक्षित होते.