Anuradha Vipat
भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास अनेकदा भाजी वाया जाते किंवा तिची चव पूर्णपणे बिघडते.
आज आपण भाजीतील मीठ कमी करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत.
बटाटा नैसर्गिकरित्या मीठ आणि अतिरिक्त पाणी शोषून घेतो. भाजी शिजल्यावर भाजीत बटाट्याचे तुकडे टाका.
जर भाजी पातळ असेल तर गव्हाच्या पिठाचा छोटासा घट्ट गोळा करून भाजीत सोडा.
रस्सा भाजीमध्ये किंवा सुक्या भाजीत थोडे ताजे दही, साय किंवा क्रीम मिसळा. यामुळे भाजीचा खारटपणा कमी होतो.
भाजीचा खारटपणा करण्यासाठी थोडासा लिंबाचा रस किंवा एक चमचा व्हिनेगर घाला.
सुक्या किंवा रस्सा भाजीत ब्रेडचा एक तुकडा बुडवून ठेवा. ब्रेड मीठ शोषून घेईल.