Fertilizer Use: खतांचा वापर आणि खर्च कमी, उत्पादन मात्र जास्त! काय आहे टेकनिक?

Swarali Pawar

खतांचा योग्य वापर

खतांचे दर वाढत असल्याने त्यांचा कार्यक्षम वापर गरजेचा आहे. योग्य नियोजन केल्यास खर्च कमी आणि उत्पादन जास्त मिळते.

Fertilizer Efficient Use | Agrowon

माती परीक्षण

मातीतील पोषक घटक किती आहेत हे आधी जाणून घ्या. त्यामुळे गरजेनुसारच खतांचा वापर करता येतो.

Fertilizer Efficient Use | Agrowon

शिफारशीनुसार खते

शिफारशीनुसार, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खतांचा वापर करा. नत्र खत हप्त्यांमध्ये दिल्यास त्याची कार्यक्षमता वाढते.

Fertilizer Efficient Use | Agrowon

बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी जिवाणू खतांनी बीजप्रक्रिया करा. यामुळे रासायनिक खतांची गरज कमी होते.

Fertilizer Efficient Use | Agrowon

खत देण्याची योग्य पद्धत

युरिया उघड्यावर टाकू नका, ते वाया जाते. खत बियाण्यांच्या बाजूला किंवा खाली द्यावे.

Fertilizer Efficient Use | Agrowon

सेंद्रिय खतांचा वापर

शेणखत, कंपोस्ट आणि गांडूळ खतांचा वापर वाढवा. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि खते अधिक परिणामकारक होतात.

Fertilizer Efficient Use | Agrowon

सूक्ष्म सिंचनाचा वापर

ठिबक सिंचनातून विद्राव्य खते दिल्यास थेट मुळांना मिळतात. यामुळे पाणी आणि खत दोन्हींची बचत होते.

Fertilizer Efficient Use | Agrowon

स्मार्ट शेती, जास्त फायदा

योग्य नियोजन केल्यास खतांचा अपव्यय टाळता येतो. यामुळे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचा नफा वाढतो.

Fertilizer Efficient Use | Agrowon

Poultry Shed: उन्हाळ्यात पोल्ट्री शेड व्यवस्थापनाच्या टिप्स!

अधिक माहितीसाठी...