Poultry Shed: उन्हाळ्यात पोल्ट्री शेड व्यवस्थापनाच्या टिप्स!

Swarali Pawar

उन्हाळ्यात विशेष काळजी

तापमान ४०°C च्या पुढे गेल्यावर कोंबड्यांवर उष्णतेचा ताण वाढतो. योग्य शेड व्यवस्थापन केल्यास मरतुक आणि नुकसान टाळता येते.

Summer Poultry Care | Agrowon

हवा खेळती ठेवा

कोंबड्यांसाठी शेडमध्ये सतत हवा खेळती राहणं गरजेचं आहे. पडदे खाली ठेवून पंखे किंवा फॉगर्सचा वापर करा.

Summer Poultry Care | Agrowon

शेड थंड ठेवण्याचे उपाय

छतावर पांढरा रंग किंवा चुना लावल्याने उष्णता कमी होते. पत्र्यावर पेंढा टाकून तो ओला ठेवल्यास शेड थंड राहतो.

Summer Poultry Care | Agrowon

जाळी आणि बारदान वापरा

शेडच्या बाजूला जाळीवर बारदान लावून ते ओले ठेवा. यामुळे आत येणारी गरम हवा कमी होते.

Summer Poultry Care | Agrowon

जमिनीची योग्य काळजी

जमिनीवर १ ते १.५ इंच तुसाचा थर ठेवावा. तूस वेळोवेळी बदलल्याने स्वच्छता आणि थंडावा टिकतो.

Summer Poultry Care | Agrowon

शेडची योग्य रचना

शेड उंचावर आणि पूर्व-पश्चिम दिशेत बांधावी. छताची कडा बाहेर असल्याने सूर्यप्रकाश आत येत नाही.

Summer Poultry Care | Agrowon

अमोनिया नियंत्रण

शेड स्वच्छ न ठेवल्यास अमोनिया वाढतो आणि उष्णता वाढते. वेळीच स्वच्छता आणि तूस बदलणे आवश्यक आहे.

Summer Poultry Care | Agrowon

गर्दी कमी ठेवा

उन्हाळ्यात कोंबड्यांची संख्या १०% ने कमी ठेवा. लसीकरण आणि हाताळणी सकाळी किंवा रात्रीच करा.

Summer Poultry Care | Agrowon

Cucumber Quality Tips: गोड आणि ताजी काकडी कशी ओळखाल? सोप्या टिप्स जाणून घ्या

अधिक माहितीसाठी...