Swarali Pawar
जास्त रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब होतो, सुपीकता कमी होते आणि उत्पादन खर्च वाढतो.
हे जिवाणू हवेतले नत्र थेट उसाला देतात. युरियाचा वापर ५०–७५% कमी होतो.
जमिनीत अडकलेले स्फुरद पिकाला उपलब्ध होते. मुळे मजबूत होऊन उसाची वाढ चांगली होते.
पालाश उपलब्ध झाल्याने ऊस मजबूत बनतो. रसाची गुणवत्ता सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
गंधकामुळे साखर उतारा वाढतो. सिलिकॉनमुळे खोड जाड व मजबूत होते.
काळ्या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते. रासायनिक लोह-जस्त खतांचा खर्च कमी होतो.
सर्व अन्नद्रव्ये एकाच वेळी मिळतात. रासायनिक खतांची गरज निम्म्यावर येते.
पाचट जाळू नये, जिवाणूंनी कुजवावे. जमीन सुपीक राहते आणि उत्पादन खर्च कमी होतो.