Anuradha Vipat
शरीरातील अंतर्गत उष्णता कमी करण्यासाठी धणे आणि खडीसाखरेचा उपाय हा आयुर्वेदातील अत्यंत खात्रीशीर घरगुती तोडगा आहे.
धणे आणि खडीसाखरेचे गुणधर्म थंड असल्याने ते शरीरातील पित्त दोष शांत करतात.
रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात १ ते २ चमचे अख्खे धणे भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून घ्या. त्यात १ चमचा वाटलेली खडीसाखर मिक्स करा आणि रिकाम्या पोटी प्या.
धणे आणि खडीसाखर समप्रमाणात घेऊन मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर बनवून एका डब्यात भरून ठेवा. रोज जेवणानंतर किंवा दुपारच्या वेळी १ चमचा पावडर कोमट पाण्यासोबत घ्या.
ज्या लोकांना उष्णतेमुळे हात-पायांची आग होते, त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे.
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडल्यामुळे रक्ताचे शुद्धीकरण होते आणि उष्णतेमुळे येणारे पुरळ कमी होतात.
शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास लघवीला आग होते, धण्याचे पाणी शरीरातील पाण्याचे संतुलन राखते.