Anuradha Vipat
महिलांमध्ये हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यास पीसीओडी , अनियमित मासिक पाळी, मूड स्विंग्स, वजन वाढणे आणि त्वचा खराब होणे अशा अनेक समस्या निर्माण होतात.
आयुर्वेदात काही औषधी फुलांचा वापर करून हार्मोन्स नैसर्गिकरित्या संतुलित राखले जातात.
जास्वंदाचा चहा प्यायल्याने इस्ट्रोजेन हार्मोन्स नियंत्रित राहतात, ज्यामुळे मासिक पाळी नियमित होते आणि पोटदुखी कमी होते.
गुलाबाच्या पाकळ्या किंवा चहा शरीरातील 'कॉर्टिसोल' कमी करून मूड चांगला ठेवण्यास मदत करतो.
हे फूल मानसिक तणाव कमी करते आणि रात्री गाढ झोप आणण्यास मदत करते, जे हार्मोन्ससाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
पारिजातकाच्या फुलांचा काढा महिलांमधील अंतर्गत सूज आणि सायकल बिघडण्याच्या समस्येवर उपयुक्त ठरतो.
झेंडूच्या फुलामध्ये इस्ट्रोजेनिक गुणधर्म असतात, जे इस्ट्रोजेन कमी किंवा जास्त झाल्यास ते संतुलित राखतात.