Red Radish : पांढऱ्या पेक्षा लाल मुळा जास्त आरोग्यदायी

Team Agrowon

पांढऱ्या मुळ्याची चव तुम्ही चाखली असेल, पण फार कमी लोकांनी लाल मुळा खाल्ला असेल. लाल मुळ्यात सामान्य मुळ्यापेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट्स आढळतात.  

Red Radish | Agrowon

लाल मुळ्यात पेलार्गोनिडिन नावाचे अँथोसायनिन असते, त्यामुळे त्याचा रंग लाल होतो. लाल मुळ्याचा वापर सॅलडमध्ये केला जातो.  

Agrowon

लाल मुळ्याची लागवडीसाठी डिसेंबर ते फेब्रुवारी हा महिना अतिशय योग्य मानला जातो.  लागवडीसाठी निचरा होणारी जमिन उत्तम मानली जाते.

Agrowon

जमिनीचा सामू ५ ते ७.५ च्या दरम्यान असावा लागतो. याशिवाय वालुकामय जमिनीतही लागवड करता येते.  लाल मुळ्याची लागवड बियांची पेरणी करुन किंवा नर्सरीत रोपे वाढवूनही करता येते.

Agrowon

पेरणीसाठी सुमारे ८ ते १० किलो बियाणे लागते. व्यावसायिक लागवडीसाठी रोपवाटिक वाढवलेल्या सुधारित वाणांची निवड करावी. पेरणीनंतर साधारण २० ते ४० दिवस लागतात.  एकरी ५४ क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळू शकते.  

Agrowon

लाल मुळ्याची योग्य व्यवस्थापन करुन चांगला नफा मिळवता येतो. कमी शेतकऱ्यांकडून त्याची लागवड होत असल्यामुळे लाल मुळा अजूनही बाजारात क्वचितच मिळतो.

Agrowon

सालाड म्हणून लाल मुळ्याचा वापर करता येतो. याशिवाय मुळ्याची भाजी ही करता येते.

Cotton Pest : कापसातील गुलाबी बोंडअळीला रोखण्याचे सोपे उपाय

आणखी पाहा...