Rose Farming : व्हॅलेंटाइन नंतर लग्नसराईचा हंगाम साधण्यासाठी गुलाब फूल उत्पादकांची लगबग

Team Agrowon

व्हॅलेंटाइन संपल्यानंतर पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गुलाब उत्पादक शेतकरी हे लग्नसराईच्या हंगामात फुले विक्रीला‌ आणण्याच्या दृष्टीने तयारी करत असतात.

Rose Farming | Agrowon

दरवर्षी या गुलाब शेतीतून खर्च वजा जाता १२ ते १५ लाख रुपयांची उलाढाल होते.

Rose Farming | Agrowon

व्हॅलेंटाइन आणि लग्न समारंभामध्ये प्रामुख्याने लाल रंगाच्या फुलांना जास्त मागणी असते.

Rose Farming | Agrowon

गुलाबाच्या मुळांना पाणी पुरविण्यासोबत पिकांच्या कॅनॉपीमध्ये आणि मुळांच्या नजील आवश्यक तो ओलावा निर्माण करून सूक्ष्म वातावरण टिकवले जाते. त्याचा पिकांच्या वाढीसाठी चांगला फायदा होतो.

Rose Farming | Agrowon

सध्या लग्न समारंभाच्या हंगामासाठी गुलाब फूल उत्पादकांची लगबग सुरू झाली आहे.

Rose Farming | Agrowon

देशांमध्ये गुवाहाटी, नागालँड, कोलकाता, जम्मू, दिल्ली, अहमदाबाद, सुरत, बडोदा, राजकोट, पणजी, बंगलोर, हैदरावाद, पटना, इंदूर, छत्तीसगड, अमरावती (आंध्र प्रदेश) या अन्य राज्यांसोबत राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर या बाजारपेठेमध्ये दरानुसार फुले पाठवली जातात.

Rose Farming | Agrowon

सध्या २० फुलांच्या एका गुलाब गड्डीचा दर १२० ते १३० रुपयांदरम्यान आहे. म्हणजेच प्रति फूल ६ ते ७ रुपये दर मिळत आहे.

Rose Farming | Agrowon

यंदा व्हॅलेंटाइनमध्ये ‌केवळ ३० टक्के फुलांचीच निर्यात झाली आहे. परिणामी स्थानिक बाजारात फुलांची आवक जास्त आल्याने अपेक्षित दर मिळाले नाहीत. आता शेतकऱ्यांची संपूर्ण मदार ही लग्नसराईवर आहे.

Rose Farming | Agrowon